रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत प्रती थेंब पाणी अधीक पिक या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्यातर्फे प्रमूख पाहुणे म्हणुन केऱ्हाळे येथील शेतकरी अमोल गणेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
त्यांना या कार्यक्रमाला सपत्नीक उपस्थीत राहण्याचा आमंत्रण मिळाले आहे. राज्यातील निवडक १० शेतकरी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. सुक्ष्म संच बसवलेल्या व शेतीत प्रभावी काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा यात सामावेश आहे.