Home Cities जळगाव भाजपा जिल्हा पुर्व युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदांची निवड

भाजपा जिल्हा पुर्व युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदांची निवड


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या जिल्हापुर्व युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदांची निवड करण्यात आली. यात जिल्हाध्यक्षपदी निलेश चव्हाण तर महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी माजी जि.प. अध्यक्षा रंजना पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ही निवड भाजपाचे जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांनी केली आहे. या नियुक्तीबद्दल राज्याचे नेते मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेषदादा पाटील, आमदार राजूमामा भोळे, आमदार संजय सावकारे, आमदार मंगेशदादा चव्हाण व जिल्हातील सर्व लोकप्रतिनिधी ,पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.


Protected Content

Play sound