Home Cities जळगाव आयएमआरच्या १० विद्यार्थ्यांची पुण्यातल्या आयटी कंपनीत निवड

आयएमआरच्या १० विद्यार्थ्यांची पुण्यातल्या आयटी कंपनीत निवड


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । केसीई इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट एंड रिसर्चच्या एमसीए शाखेच्या १० विद्यार्थ्यांची आज पुणे स्थित ग्राव्हीटी सोफ्टवेअर तर्फे निवड करण्यात आली.

त्यांची निवड ही आयटी कंपनीत लाइव्ह प्रोजेक्टसाठी झाली असून त्यांना कंपनीतर्फे तीन महिन्यांची विशेष ट्रेनिंग सुद्धा दिली जाणार आहे. त्यापूर्वी एमसीए शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी ग्राव्हीटी सोफ्टवेअरचे संचालक निखील चौधरी ह्यांनी चार तासांचा सेमिनार घेतला, ज्यात त्यांनी आयटी कंपनीत नोकरीसाठी प्रयत्न कसे करावे, त्यासाठी कुठल्या स्किल्स लागतात, त्या कश्याप्रकारे साध्य कराव्यात, आयटी कंपनीत इंटरव्यूची तयारी कशी करावी, रेज्युमे कसा बनवावा, सध्या भारतात आणि जगात कुठल्या आयटी क्षेत्रात जास्त वाव आणि नोकरीच्या संधी आहेत तसेच त्यांनी जावा टेक्नोलॉजीवर देखील विद्यार्थ्यांना प्रक्टिकल ट्रेनिंग दिली. ह्या सेमिनारला आयएमआरचे ८९ विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आयएमआरच्या संचालिका डॉ. शिल्पा बेंडाळे ह्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ह्या संधीचा लाभ घेऊन स्वतःचे उज्ज्वल भविष्य घडविण्याचे आणि त्यासाठी पूर्ण मेहनत घेण्याचे मंत्र दिले. ह्यावेळी मंचावर अकादमिक डीन डॉ. तनुजा फेगडे, एमसीए कोर्डीनेटर प्रा. उदय चतुर हे उपस्थित होते. ह्या सेमिनारचे संचालन आणि सूत्रसंचालन ट्रेनिंग एंड प्लेसमेंट हेड प्रा. पुनीत शर्मा ह्यांनी केले.


Protected Content

Play sound