जळगाव जिल्हा परिषदेच्या मुदत संपलेल्या १८ गाळेधारकांना जप्तीची बजावली नोटीस

जळगाव प्रतिनिधी । शहरातील पुष्पलता बेंडाळे चौकातील जिल्हा परिषदे अल्पबचन भवनातील मुदत संपलेल्या १८ गाळे धारकांना थकित भाडे भरण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे नोटीस पाठविण्यात आली असून याची कार्यवाही आज सकाळी १० वाजता अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

शहरातील पुष्पलता बेंडाळे चौकातील जिल्हा परिषद अल्पबचन भवनात असलेले १८ गाळे हे जिल्हा परिषदेच्या मालकीचे आहे. या गाळ्यांची २२ मार्च २०१८ रोजी मुदत संपली होती. मुदत संपल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने गाळे खाली करून दुकानाचे भाडे देण्यासाठी नोटीसही दिली होती. त्यानंतर तोंडी व लेखी माहितीही देण्यात आली. दरम्यान आता कोणताही करार अस्तित्वात नसल्याने बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवण्यात आलेल्या दुकाने सोडावे असे नोटीसीत नमूदही केले होते. यासाठी जिल्हा परिषदेने पाठविलेल्या नोटीसाच्या विरोधात सर्व गाळेधारक जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली होती. 

दरम्यान १७ जुलै २०१९ रोजी न्यायालयाने निकाल देवून कायदेशिररित्या मार्गाने गाळे ताब्यात घेण्याचे आदेश केले आहे. बेकायदेशीर दुकाने ताब्यात ठेवून  आणि करार संपल्यापासून आजपर्यंतचा ५ पट दंडासह एकुण १ कोटी ८३ लाख ६८ हजार ४७३ रूपयांचा दंड ठोठावला आहे. वरील दंड आठ दिवसांच्या आत भरवा आणि दुकाने खाली करावी अन्यथा जप्तीची कारवाई करण्याचा इशारा बजावलेल्या नोटीसात म्हटले आहे. यावेळी प्रभारी उपअभियंता नंदकुमार पवार आणि शाखा अभियंता आर.एस. पाटील यांच्यासह पथकाने ही कारवाई केली आहे.

 

Protected Content