उंटावद गावात दारूबंदी ग्रामसभेतून निर्णय; अंमलबजावणीसाठी पोलिसांना निवेदन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील उंटावद या गावात प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या ग्रामसभेत गावकऱ्यांनी दारूबंदीचा निर्णय घेतला आहे. तसेच त्या संदर्भातील ठराव करून गावात पोलीस प्रशासनाने कायमस्वरूपी दारूबंदीची अमलबजावणी करावी म्हणुन यावल पोलीस ठाण्यात नागरिकांनी निवेदन दिले आहे व गावात दारू विक्री करणाऱ्या चार लोकांची नावे देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

उंटावद तालुका यावल या गावात प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी संपन्न झाली या ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी सर्वानुमते दारूबंदीसाठी आग्रह धरला सरपंच छोटू भिल, उपसरपंच भावना पाटील यांच्या उपस्थितीमध्ये येथे दारूबंदीचा ठराव करण्यात आला. दरम्यान ठराव केल्यानंतर ग्रामस्थांनी तेथूनच यावल पोलीस ठाणे गाठले. आणि यावल पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे यांच्याकडे गावात दारूबंदीचा ठराव करण्यात आला असून गावात दारू दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

गावात दारू बंदीच्या अंमलबजाणी करीता पोलिसांनी देखील दारू विक्रेत्यांवर अंकुश ठेवावा अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच गावात जे चार लोकं दारू विक्रीचा व्यवसाय करतात त्यांची नावे नागरिकांनी दिली आहे. तेव्हा सदर निवेदन देते प्रसंगी मोठ्या संख्येत महिला व पुरूष ग्रामस्थांची उपस्थिती होती. यावल तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीने अशा प्रकारे ग्रामसभेत आपआपल्या गावातील अवैद्य मार्गाने विक्रीला जाणाऱ्या दारू ही कायमची बंद व्हावी असा ठराव पोलीस प्रशासनाकडे दिला आहे असे असतांना देखील पोलीस प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात असल्याची ओरड तालुक्यातील ग्रामस्थ मंडळीकडून करण्यात येत आहे .

Protected Content