भुसावळ (प्रतिनिधी) येथील भाजपचे नगरसेवक रवींद्र बाबूराव खरात यांच्या कुटुंबावर करण्यात आलेल्या हल्ल्यात पाच जण ठार झाले आहेत. ‘लाइव्ह ट्रेंड्स न्यूज’कडे भुसावळमधील हत्याकांडनंतरची व मृतदेह जळगाव जिल्हा रुग्णालयात आणत असल्याची काल रात्रीची काही थरारक एक्सक्लुझीव व्हिडीओ फुटेज मिळाली आहेत.
काल रात्री पावणेदहाच्या सुमारास रवींद्र बाबूराव खरात यांच्या कुटुंबावर हल्ला चढविण्यात आला. यात स्वत: रवींद्र बाबूराव खरात, त्यांचे बंधू सुनील बाबूराव खरात, मुलगा प्रेमसागर मुलगा रोहित आणि सुमीत गजरे हे ठार झाले आहेत. तर ऋत्वीक या मुलासह पत्नी आणि दोन जण गंभीर जखमी झालेले आहेत. दरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी पोलीसांना दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी पहिल्यांदा सुनील बाबूराव खरात यांच्यावर गोळीबार करून गुप्तीने वार केले. हा आवाज ऐकून रवींद्र खरात आणि त्यांचे कुटुंबिय घराबाहेर आले असतांना हल्लेखोरांनी त्यांच्याकडे मोर्चा वळविला. यात रवींद्र खरात यांच्यावर घराजवळ गोळीबार करण्यात आला. तर त्यांची मुले जीव वाचवण्यासाठी पळाली असतांना आरोपींनी त्यांचा पाठलाग करत रेल्वे हॉस्पीटलजवळ त्यांनाही गाठत ठार मारले होते.
दरम्यान, खरात परिवारावरील हल्ल्यानंतर भुसावळमधील स्थिती नेमकी काय होती. तसेच जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर नेमके वातावरण किती तणावग्रस्त होती. याची जाणीव करून देणारे काही व्हीडीओ नुकतेच समोर आले आहेत.