जम्मू (वृत्तसंस्था) जम्मूमधून कलम १४४ (जमावबंदी) हटवण्यात आले आहे. शनिवार म्हणजेच १० तारखेपासून सर्व शाळा आणि कॉलेज सुरु करण्यात येणार आहे. मात्र इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती जम्मूच्या उपायुक्त सुषमा चौहान यांनी दिली आहे.
जम्मू-काश्मीरमधली परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.जम्मूच्या उपायुक्तांच्या (डेप्युटी कमिश्नर) कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, जम्मू जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रातून कलम १४४ रद्द करण्यात येत आहे. १० तारखेला सगळ्या शाळा, महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्था सुरू होतील. जमावबंदी हटवण्यात आली असल्या कारणाने सुरक्षा यंत्रणांना सुरक्षेकडे अधिक लक्ष द्यावं लागणार आहे. जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राज्यातील परिस्थितीचा आढवा घेतला होता.