शिल्पकार जयदीप आपटेला अटक

सिंधुदुर्ग-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सिंधुदुर्गच्या राजकोट किल्ल्यावर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. ही दुर्घटना होऊन दोन आठवडे झाले तरी हा पुतळा उभरणारा शिल्पकार जयदीप आपटे हा फरार होता. तो पोलिसांना सापडत नव्हता. पोलिसांचे सात पथक त्याच्या मागावर होते. अखेर पोलिसांनी मंगळवारी लुकआऊट नोटीस जारी केली होती. फरार असलेल्या जयदीप आपटेला पोलिसांनी बुधवारी रात्री त्याच्या कल्याण येथील घरातून अटक केली आहे. तो रात्री त्याच्या बायकोला आणि आईला भेटायला आला होता. त्याच्या पत्नीनेच पोलिसांना तो येणार असल्याची माहिती दिल्याचे उघड झाले आहे.

नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्ग येथील मालवणच्या राजकोट येथे ३५ फूटी शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. या साठी मोठा दिमाखदार सोहळा देखील आयोजित करण्यात आला होता. मात्र, हा पुतळा उभारल्यावर केवळ सात ते आठ महिन्यात हा पुतळा गेल्या महिन्यात कोसळला. या पुतळ्यावरून मोठे राजकारण राज्यात सुरू आहे. अनेक नागरिकांनी या घटनेप्रकरणी सरकार विरोधी संताप व्यक्त केला होता. तसेच हा पुतळा उभरणारा जयदीप आपटे या शिल्पकारला अनुभव नसतांना, त्याला याचे काम का देण्यात आले असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला होता. दरम्यान, या प्रकरणी जयदीप आपटे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मालवण पोलिस तसेच मुंबई पोलिसांच्या सात तुकड्या जयदीप आपटेचा शोध घेत होते. मात्र, आपटे सापडत नव्हता.

जयदीप आपटे दुर्घटना घडल्यापासून फरार होता. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, बुधवारी कल्याण पोलिसांनी जयदीप आपटेला त्याच्या कल्याण येथील राहत्या घरातून अटक केली होती. त्याला अटक केल्यावर पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात असणाऱ्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. एका इंग्रजी वृत्त पत्राने, जयदीप आपटेला अटक आपटेला कशी अटक करण्यात आली या बाबत वृत्त दिलं आहे. त्याच्या पत्नीनेच या प्रकरणी पोलिसांना माहिती दिली असल्याचं या वृत्तात म्हटले आहे.

जयदीपचे नातेवाईक व मित्रही त्याला पोलिसांसमोर जाण्याचं सांगत होते. मात्र, तो समोर येत नव्हता. अखेर बुधवारी तो त्याच्या बायकोला आणि आईला भेटण्यासाठी येणार होता. याची माहिती त्याच्या पत्नीला होती. तो तिच्याशी संपर्कात होता. त्याने पत्नीला फोन करून घरी येणार असल्याची माहिती दिली. दरम्यान, तो पोलींसासमोर आत्मसमर्पण करणार होता. या साठी तो घरच्यांना भेटण्यासाठी आला होता. या पूर्वी पोलिसांनी त्याच्या पत्नीची व आईची या प्रकरणी चौकशी केली होती. त्याच्या सासुरवाडीत जाऊन पोलिस त्याचा शोध घेत होते. दरम्यान, जयदीप हा बुधवारी रात्री अंधाराचा फायदा घेत व पोळीसांना चकवत कल्याणमधील घरी आला. मात्र, जयदीप भेटीला येणार असून तो आत्मसमर्पण करणार हे आधीच ठरल्याच माहिती त्याचे वकील गणेश सोवणे यांनी केली आहे.

Protected Content