जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील नेरी नाका येथील एसटी वर्क शॉप परिसरात मोकळ्या जागेत पडलेल्या भंगारातील वस्तूंना अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेत किरकोळ नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
याबाबत माहिती अशी की, रविवार १२ जून रोजी दुपारी ४ वाजता एस.टी. वर्कशॉपच्या मागे असलेल्या भंगारला भर पावसात आग लागली असल्याची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाला मिळाली. त्यानुसार तत्काळ २ बंब घटनास्थळी दाखल झाले व बंबाने पाण्याचा तसेच फोमचा वापर करत आगीवर नियंत्रण मिळविले अग्निशमन दलाचे जवान भारत बारी, रविंद्र बोरसे, वाहन चालक-युसुफ पटेल, नंदकिशोर खडके, मोहन भाकरे, नितीन बारी यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी परिश्रम घेतले.