वैज्ञानिकांचे कर्तृत्व आहे, त्यांना सांगू द्या : राज ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) एक अंतर्गत चाचणी म्हणून वैज्ञानिकांनी क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह पाडला. त्याबद्दल वैज्ञानिकांचे नक्कीच अभिनंदन आणि खरंच त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो. पण म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करून ही बातमी सांगायची काय गरज? वैज्ञानिकांचे कर्तृत्व आहे त्यांना सांगू द्या.त्यांना प्रसिद्धी मिळू द्या,” अशा शब्दात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राद्वारे लो अर्थ ऑर्बिटमधील उपग्रह उद्ध्वस्त करत आज भारताने अंतराळ क्षेत्रात मोठे यश मिळवल्याची माहिती दिली. दरम्यान, ‘मिशन शक्ती’ मोहीम यशस्वी करणाऱ्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. परंतु शास्त्रज्ञांनी मिळवलेल्या यशाची बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना सांगण्याची काय गरज होती? असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करणार असल्याचे वृत्त आल्यापासून देशात चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, भारताने उपग्रहविरोधी क्षेपणास्राच्या सहाय्याने उपग्रह पाडला आहे. अशा प्रकारे क्षेपणास्राच्या सहाय्याने उपग्रह पाडणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत चौथा देश ठरला आहे. अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली होती.

Add Comment

Protected Content