अखिल भारतीय भिक्खू संघाच्या वतीने श्रामनेर शिबिर

vihar sangh

 

फैजपूर प्रतिनिधी । साकेत बौद्ध विहार येथे दि. १ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबरपर्यंत अखिल भारतीय भिक्खू संघाच्या अध्यक्षतेखाली भव्य श्रामनेर शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या भव्य श्रामनेर शिबिराचे उद्घाटन वंदनिय भंते गुणरत्न महाथेरो यांचे हस्ते करण्यात आले आहे.

याप्रसंगी भन्ते धम्मशरण महाथेरो, भन्ते अश्वजीत, भन्ते धम्मबोधी थेरो, भन्ते सारीपुत्त, भंन्ते आनंद, भन्ते बोधानंद, भन्ते सुमनतिस्स उपस्थित होते. वरील भन्ते यांनी श्रामनेर शिबिर श्रावक यांना प्रवज्जा विधी देवून १०१ श्रामनेरांना प्रवज्जीत करण्यात आले. तथागत गौतम बुद्ध यांची विचार धारा, त्यांनी दिलेला शांतीचा संदेश तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा यावर मार्गदर्शन करण्यात आले. भगवान बुध्दांनी दिलेल्या अष्टांगिक मार्गाचे अनुकरण करून आपले जीवन मंगलमय करण्याचा राजमार्ग म्हणजेच बौध्द धम्म असून धम्माचा आचार, प्रचार, प्रसार उत्थानास आपण कटीबध्द असल्याचे प्रतिपादन भन्ते सुमनत्तिस यांनी केले.

श्रामनेर शिबिराचे मुख्य आयोजक धम्मभुषण पुरस्काराने सन्मानित आयु. महेंद्र तायडे हे असून मार्गदर्शिका आयु. रमाबाई भालेराव, सहयोगी संजना तायडे, आयु.पूजा तायडे मार्गदर्शन करीत आहेत. श्रामनेर शिबिराची धुरा आयोजक अशोक तायडे, विश्वनाथ तायडे, शशिकांत तायडे, गौतम तायडे, रामकृष्ण तायडे, राजू तायडे, शामराव तायडे, संदिप तायडे, किशोर तायडे, प्रदिप तायडे, राजेंद्र तायडे, सिध्दार्थ तायडे, संजय निकम (ऑ.फ.वरणगाव), संजय भालेराव, दिलीप मोरे आदींचे सहकार्य लाभत असून कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी धर्मेंद्र तायडे, संजय तायडे, जितेंद्र तायडे, विलास तायडे, सूरज तायडे, किशोर मनुरे, पप्पू भालेराव, नवल तायडे, समाधान तायडे, विशाल तायडे, आकाश तायडे, सागर तायडे, संदिप महाले, अजय तायडे, सतिश तायडे, प्रबूध्द तायडे, उपासिका किर्ती तायडे, संगीता तायडे, भिमाबाई तायडे, हेमलता तायडे, सुमन तायडे, लताबाई तायडे, शकुंतला तायडे, सिंधू तायडे तसेच सर्व उपासक-उपासिका परिश्रम घेत आहेत.

Protected Content