Home Cities मुक्ताईनगर मुक्ताईनगरमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

मुक्ताईनगरमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळेत आज एक आगळा-वेगळा उपक्रम पार पडला. स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांचे सुपुत्र  हर्षराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना स्कुल बॅग आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम केवळ साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरला.

या उपक्रमामुळे गरजू आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाली. बॅग, वही, पेन, पेन्सिल यांसारख्या आवश्यक वस्तू मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. शिक्षणासाठी आवश्यक साधनांचा अभाव अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवतो, यासाठीच या वाटप उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

यावेळी शिवसेना आणि युवासेनेचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेतील शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी आणि पालकांनी देखील कार्यक्रमास उस्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या आयोजनात स्थानिक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

शालेय विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आणि शिक्षणातील अडथळे दूर करण्याच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारचे उपक्रम समाजासाठी मार्गदर्शक ठरू शकतात. वाढदिवस साजरा करण्याचा हा सामाजिक आणि शैक्षणिक मार्ग नव्या पिढीला शिक्षणात पुढे जाण्यास नक्कीच मदत करेल.


Protected Content

Play sound