एरंडोल, प्रतिनिधी | तालुक्यातील शालेय पोषण आहारात असलेल्या त्रुटीबाबत शालेय पोषण आहार विस्तार अधिकारी विश्वास एस. पाटील यांनी विविध शाळांना भेट दिली असता यात मोठा घोळ होत असल्याचे त्यांना आढळून आले.
विस्तर वृत्त असे की तालुक्यातील बहुतांश शाळेत राज्य शासनाचा जीआरनुसार पहिली ते आठवीपर्यँतच्या विध्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मिळत आहे. परंतु काही शाळेच्या मुख्यध्यापकांच्या दुर्लक्षितपणामुळे व एरंडोल तालुक्यातील शालेय पोषण आहारात मोठा घोळ होत आहे. शासनाच्या नियमावलीनुसार वेगवेगळे मेनु बनवुन द्यावे लागतात. भाजी भात, खिचडी, दाळभात, असे अन्न शिजवून घ्यावे असा राज्य शासनाचा जीआर आहे. परंतु काही शाळांमध्ये फक्त आणि फक्त खिचडी बनवुन दिली जात असल्याचे स्पष्ट चित्र समोर दिसत आहे. ही गुप्त माहिती एरंडोल तालुक्यातील शालेय पोषण आहार विस्तार अधिकारी विश्वास एस.पाटील यांना मिळाली असता त्यांनी आपल्या सोबत टीम घेऊन दि.२१ऑगस्ट रोजी तालुक्यातील अनेक शाळेंना भेटी दिल्या व कासोदा येथील साधना माध्य.विद्यालय येथे भेट दिली. शालेय पोषण आहार कसा शिजवला जातो याची पाहणी केली. मुलांना विचारणा केली , ज्या ज्या शाळांमध्ये पाहणी केली त्या त्या शाळेंमध्ये त्रुटी सापडली त्या शाळेंवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. ज्या विद्यार्थ्यांना पूरक आहार मिळत नाही त्या शाळेतील शिक्षकांना कडक शब्दात सूचना दिल्या देऊन नोटीस बजावणार असल्याचे सांगितले.