प्राथमिक शिक्षणाधाऱ्यांविरोधातील उपोषण आश्वासनानंतर मागे (व्हिडीओ)

0
23
WhatsApp Image 2019 05 20 at 2.44.46 PM
WhatsApp Image 2019 05 20 at 2.44.46 PM

WhatsApp Image 2019 05 20 at 2.44.46 PM

जळगाव (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथील श्री दत्त गुरु इंग्लिश स्कूलच्या चेअरमन व पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणास आज जिल्हा परिषद येथे सोमवार २० मे रोजी सकाळी ११ वाजता प्रारंभ केले. परंतु, सायंकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथामिक शिक्षणाधिकारी यांनी मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.

आरटीई २५ टक्के विद्यार्थी प्रतिपूर्ती अनुदान शाळांना वाटप करतांना जाणीवपूर्वक, हेतुपुरस्कर संस्था चालकांकडून टक्केवारीने प्राथमिक शिक्षणाधिकारी त्यांच्या कर्मचाऱ्यांन मार्फत व एजंट मार्फत पैसे गोळा करीत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यानी केला होता. यासह इतर मागण्यांबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर जगन्नाथ पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांन संदर्भात विविध तक्रारी देण्यात आल्या होत्या. परंतु, त्यांच्यावर कोणतीही द्खल घेतलीं नसल्याने श्री दत्त गुरु इंग्लिश स्कूलचे चेअरमन ऍड. योगेश मुरलीधर पाटील स्कूलचे पदाधिकारी व इतर संस्थाचे पदाधिकारी उपोषण करत होते. परंतु, सायंकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथामिक शिक्षणाधिकारी उपोषणस्थळाला भेट देऊन ५ दिवसात कारवाईचे आश्वसन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले असून ५ दिवसांत कारवाई न झाल्यास पुन्हा उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.

या आहेत मागण्या
आरटीई २५ टक्के विद्यार्थी प्रतिपूर्ती १०० टक्के अनुदान शाळांना त्वरित मिळावे, आरटीई मान्यता नूतनीकरण शाळांना त्वरित देण्यात यावे, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर जगन्नाथ पाटील यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारींची दखल घेऊन त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here