मुक्ताईनगर प्रतिनिधी । तालुक्यातील जे ई स्कूल आणि ज्यु. को. मुक्ताईनगरमधील प्राचार्यांनी व शिक्षकांनी जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणीताई खडसे – खेवलकर यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण वर्षभर शाळेतील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, यासाठी शिक्षणाधिकारी जळगाव व गट शिक्षणाधिकारी मुक्ताईनगर यांनी दिलेल्या सूचनेनुसार तथा वैयक्तिक पातळीवर योजनाबद्ध उपक्रम राबविला आहे.
गेल्या संपूर्ण वर्षापासून कोरोना महामारीने विळखा घातला आहे. पूर्ण जगाची चाक थांबली. कधी नव्हे ते किंबहुना न भूतो न भविष्यती असे जग थांबले, आणि त्याला शिक्षण विभाग तरी कुठून अपवाद ठरणार? गेल्या अवघ्या वर्षापासून गजबजणारी शाळा महाविद्याल्य ओस पडली. परंतु जिथे इच्छा असते तिथे मार्ग असतात, म्हणून की काय केंद्र सरकार व राज्य सरकारांच्या नियमावलीनुसार संपूर्ण राज्यात शाळा बंद पण शिक्षण चालू… या उक्तीप्रमाणे ऑनलाईन शिक्षण प्रक्रिया सुरू झाली. संपूर्ण देशात/ राज्यात उपलब्ध साधन सामग्री आणि भौतिक साधने यांच्या आधाराने शाळा महाविद्यालयांनी आपापल्या परीने शिक्षणाची प्रक्रिया सुरु ठेवली. याचप्रमाणे मुक्ताईनगर तालुक्यातील मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित पहिली व जिल्ह्यातील नामवंत शाळा जे ई स्कूल आणि ज्यु.को. मुक्ताईनगर मधील प्राचार्यांनी व शिक्षकांनी संस्थेचे जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण वर्षभर शाळेतील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये यासाठी मा. जिल्हा शिक्षणाधिकारी जळगाव व गट शिक्षणाधिकारी मुक्ताईनगर यांनी दिलेल्या सूचनेनुसार तथा वैयक्तिक पातळीवर योजनाबद्ध उपक्रम राबविले. त्यामुळे शिक्षण विभाग यांनी हाती घेतलेल्या स्वाध्याय उपक्रमात शाळेतील जवळपास 90 टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
दिक्षा ॲप चा वापर विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त करावा, यासाठी प्रयत्न करून ॲपवरील वेगवेगळ्या वर्गांसाठी व विषयांसाठी असलेले पाठ्य घटक, व्हिडिओ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक वर्गांचे स्वतंत्ररीत्या मुला मुलींचे व्हाट्सऍप ग्रुप तयार केले आहे. ग्रुप वर विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या पाठ घटकांवर आधारित युट्युबवरील व्हिडीओ पाठवून, तसेच प्रत्यक्ष मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करून, वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना कार्यमग्न ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देता यावे यासाठी ऑनलाइन आभासी वर्गांचे आयोजन करण्याच्या दृष्टीने संस्थेच्या चेअरमन तथा संस्थाचालक यांनी सूचना केल्या. तसेच काही उपक्रमशील शिक्षकांनी स्वतःचे यूट्यूब चैनल तयार करून त्यामाध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत शालेय अभ्यासक्रम पोहोचविण्याचा प्रयत्न झाला. लॉक डाऊन च्या काळात आणि या बदलणार्या परिस्थितीचा विचार करून सर्व शिक्षक तंत्रस्नेही कसे होतील याचा प्रयत्न केला. याचाच परिपाक म्हणून शैक्षणिक वर्ष 2021/ 22 जरी नियमानुसार 14 जूनपासून सुरू होत असले तरी इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून 24 मे 2021 पासून आंतरजालाच्या माध्यमातून आभासी वर्गांना सुरुवात करण्यात आली. यासाठी संस्थेच्या चेअरमन रोहिणीताई यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करून काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यांना असलेल्या अडीअडचणी समजून घेतल्या. अशा अडचणीच्या काळात विद्यार्थ्यांनी पालकांनी आपल्याला येणाऱ्या अडीअडचणी नक्कीच मांडाव्यात व त्या सोडवण्यासाठी आपण सदैव प्रयत्न करू असे आश्वासन देऊन आभासी वर्गाला प्राचार्य आर पी पाटील यांच्या सह इयत्ता 10 वी मराठीच्या वर्गाला भेट दिली आणि त्यातून आपल्या कार्याची आणि शैक्षणिक तळमळीचीही ओळख करून दिली. तसेच यापुढेही आपले हे विद्यार्थी हिताचे व शैक्षणिक कार्य असेच सुरू राहिल असे मत मांडून आपला संवाद थांबविला.