चाळीसगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील जुनवणे येथे मंगेश चव्हाण मित्र परिवारातर्फे आज (दि.९) गरजू विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले. जुनवणे हे तालुक्यातील शेवटचे गाव असून या गावापासून मराठवाड्याची हद्द सुरू होते.
या दुर्गम अशा गावात आज मंगेश चव्हाण यांनी भेट देऊन प्राथमिक व माध्यमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना दप्तर वाटप केले.मंगेश चव्हाण गावात आल्यामुळे गावात प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. गावातून त्यांची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. अबाल वृद्धांचे आशीर्वाद घेत त्यांनी गावाच्या विकासाचा संकल्प केला.