
यावल (प्रतिनीधी) तालुक्यातील परसाडे येथे आदीवासी तडवी भिल्ल युवा कृती समितीच्या वतीने विद्यार्थांना विशेष मार्गदर्शन योजनेअंतर्गत नुकतेच शालेय साहीत्य वाटप करण्यात आले.
परसाडे तालुका यावल येथील जिल्हा परिषदच्या शाळेत आदीवासी तडवी भिल्ल युवा कृती समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय साहीत्य वाटप करण्यात आली व विशेष मार्गदर्शन मोहीम अंतर्गत कार्यक्रम संपन्न झाले. जिल्हा परिषद शाळेत संपन्न झालेल्या शालेय साहीत्य वाटप आणि विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परसाडे ग्राम पंचायतच्या सरपंच बबीता महमंद तडवी या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणुन उपसरपंच रुस्तम ईब्राहीम तडवी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष छब्बीर जाफर तडवी ,हुसैन सायबु तडवी, अरमान सुपडु तडवी, रमेश सावळे, बिस्मिल्ला गंभीर तडवी, महमंद तडवी, गफुर तडवी, बशीर तडवी सकावत याकुब तडवी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी १०५ विद्यार्थ्यांना शालेयपयोगी साहित्य वाटप करण्यात आलीत. कार्यक्रमाची प्रस्तावना आदीवासी तडवी युवा कृती समितीचे अजीत ( राजु) तडवी यांनी केले. कार्यक्रमास उपास्थित मान्यवरांचे स्वागत सत्कार समितीचे मजीत अरमान तडवी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदीवासी तडवी भिल्ल युवा कृती समितीचे सकावत याकुब तडवी, शाहरुख तडपी, शकील तडवी, हुसैन तडवी, अजीत ( राजु ) तडवी यांनी परीश्रम घेतले. त्यांना परसाडे जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका हसीनाबाई तडवी शाळेच्या उपशिक्षक कल्पना माळी, वासुदेव बाविस्कर शिक्षक अजीत तडवी आदी कर्मचारी वृंद यांनी विशेष सहकार्य केले. उपस्थितांचे आभार उपशिक्षक कल्पना माळी यांनी मानले.