यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील अतिदुर्गम भागात सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या डोंगरदे या आदीवासी पाडयावर शालेय साहीत्य वितरीत करण्यात आले. सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या आश्रय फाऊंडेशनच्या माध्यमातून आणि टायगर ग्रुप यांच्या संयोजनातून हा स्तुत्य उपक्रम नुकताच राबविण्यात आला.
यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या आदीवासी पाडयावर यावल येथील सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक तथा आश्रय फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे यांच्या माध्यमातून डोंगरदे या संपूर्ण आदिवासी गावातील विद्यार्थ्या शिक्षणा पासून वंचीत राहू नये, या सामाजीक बांधीलकीच्या दृष्टीकोणातुन शालेय विद्यार्थ्यांना साहीत्य वितरण करण्यात आले. आदीवासी पाडयावर आणि ग्रामीण भागातील वस्तीवरील गोरगरीब आणी होतकरू विद्यार्थ्यांनी शिक्षणापासुन वंचीत न राहता जास्तीत जास्त शिकुन शिक्षण घेवुन पुढे जावे, हाच सामाजिक भावनेतून मदतीचा हात म्हणून आम्ही हा कार्यक्रम राबवित असल्याचे डॉ. कुंदन फेगडे यांनी सांगीतले.
डोंगरदे येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास गावातील आदीवासी बांधव आणि महीला मोठया संख्येने उपस्थित होत्या. आश्रय फाउंडेशन आणि टायगर ग्रुपच्या माध्यमातुन पार पडलेल्या या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी डॉ. कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली टायगर ग्रुपचे उज्वल कानडे, रितेश बारी, मनोज बारी, सागर इंगळे, प्रथमेश घोडके, हर्षल कुलकर्णी, भुषण फेगडे, मनोज माळी, केतन चोपडे, भोजराज ढाके आदींनी परिश्रम घेतले.