१० वी, १२ वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

EXAM

पुणे प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि १२ वीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार इयत्ता दहावीची लेखी परीक्षा मंगळवार दि. ३ ते २३ मार्च २०२० या कालावधीत घेण्यात येणार आहे. तर, इयत्ता १२ वीची लेखी परीक्षा मंगळवार दि.१८ फेब्रुवारी ते दि. १८ मार्च २०२० या कालावधीत घेण्यात येणार आहे.

या बरोबरच, प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि इतर विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळांना तसेच कनिष्ठ महाविद्यालयांना कळवण्यात येईल असे शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. शिक्षण मंडळाचे हे अंतिम वेळापत्रक पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा ९ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांसाठी आहे. हे वेळापत्रक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक १० ऑक्टोबर २०१९ पासून उपलब्ध असल्याचे मंडळाने जाहीर केले आहे. विविध संघटना, पालक, शिक्षक याच्याकडून आलेल्या सूचनांचा विचार करूनच ही वेळापत्रके अंतिम केल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.

Protected Content