जळगाव प्रतिनिधी । विनापरवाना आणि अवैधरित्या चोरटी वाहतूक करणाऱ्या 12 ट्रॅक्टरांवर महसूल विभागाने पोलीसांच्या मदतीने कारवाई केली असून ट्रॅक्टरांसह दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहे. वाळूमाफीयांवर केलेल्या कारवाईमुळे परीसरात एकच खळबळ उडाली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज विभागीय पोलीस अधिकारी निलाभ रोहम आणि अपर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके यांना सुचनेनुसार आज पोलीस प्रशासनाने साध्यावेशातील 10 कर्मचाऱ्यांचे तीन पथक तयार केले. सावखेडा, मोहाडी आणि धानोरा या गावाकडे रवाना केले. मात्र तिघांना सावखेडा शिवारातील गिरणा नदीत चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरांवर कारवाई करण्याचे नियोजन केले. तिनही पथकाने दुपारी 12 वाजेच्या सुमारास सावखेडा शिवारात नदीत उतरून एकुण 12 ट्रॅक्टर आणि संबंधित व्यक्तीचे 9 दुचाकी वाहने जप्त केली. यातील दोन ते तीन ट्रॅक्टर पळविण्यात यश आले.
पोलीसांनी केलेल्या कारवाईतील 12 ट्रॅक्टर आणि 9 दुचाकी वाहने जप्त करण्यात आली असून संबंधित वाळू वाहतूकदारांवर गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे. यातील 7 ट्रॅक्टर आणि 6 दुचाकी शहर वाहतूक शाखेच्या तर उर्वरित 5 ट्रॅक्टर आणि 3 दुचाकी तहसील कार्यालयाच्या ताब्यात देण्यात आले आहे.