सावदा येथे बारागाड्या उत्साहात (व्हिडीओ)

sawadda baragadya

सावदा प्रतिनिधी । येथील स्थानिक व परिसरातील नागरिकांचे श्रद्धस्थान असलेले खंडेराव महाराज देवस्थान येथे मल्हारी मार्तंड व बानूदेवी व म्हाळसा देवी यांचे जुने जागृत देवस्थान आहे. येथे सालाबादप्रमाणे २ रोजी संध्याकाळी ६ वाजता भगतबुवा अशोक वसंत पवार यांनी बारागाड्या ओढल्या.

त्यांना आकाश वंजारी व राहूल पवार हे साथीला होते आहे. आज सकाळी मंदिरात तडी भरण्यात आली नंतर आरती करण्यात आली. दुपारी ४ वाजता ग्राम प्रदक्षिणा करून पाच वाजेला सर्व बारागाड्यांची पाच वेळा प्रदक्षिणा घालून पूजा करण्यात आली. यावेळी खासदार रक्षा खडसे, राजेंद्र चौधरी, राजेश, शामकांत पाटील, आकाश वंजारी, राहुल पवार, प्रमोद वाघूळदे, गोपाळ नेमाडे, मनोज नेमाडे, रोशन वाघूळदे, गुणवंत वाघूळदे, गौरव भंगाळे, गणेश माळी, मेघश्याम धांडे, रामदास नेमाडे, उमाकांत नेहते, अतुल नेहते, भीमराज भारंबे, त्रबक वाघूळदे आदी उपस्थित होते.

संध्याकाळी ५ वाजता संतोष जोशी यांनी विधीवत देवतेचे पूजन केले व आरती होऊन पाच भगत यांनी नवरता सह प्रदक्षिणा सर्व गाड्यानं मारून अशोक भगत यांनी बारा गाड्या ओढल्या. पूजा करून या निमित्ताने मोठी गर्दी होत असते. खेळणीचे, फराळाची दुकाने थाटलेली होती. यावेळी यावर्षी जय मल्हार ग्रुपचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहे.

<p>Protected Content</p>