मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १५ मधून सविता सुभाष भलभले यांच्या उमेदवारीची औपचारिक घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वीही त्या या प्रभागातून निवडणूक लढविल्यामुळे नागरिकांमध्ये त्यांची ओळख मजबूत असून निवडणुकीला रंगत येऊ लागली आहे.

शिवसेना शहर संघटक वसंत सुभाष भलभले यांच्या मातोश्री असलेल्या सविता भलभले यांनी मागील कार्यकाळात विविध समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतल्याचे नागरिकांच्या चर्चेत ऐकायला मिळत आहे. प्रभागातील गटारींचे काम, रस्त्यांची दुरुस्ती, विद्युत सोयी उपलब्ध करून देणे, महिलांच्या अडचणी सोडविण्याचे प्रयत्न अशा अनेक कामांमध्ये त्यांचा पुढाकार महत्त्वाचा ठरला आहे.

प्रभागातील सर्वात मोठी समस्या असलेल्या पाणीटंचाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी टँकरद्वारे घराघरांत पाणीपुरवठा करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे नागरिकांनी नमूद केले. कामगार योजनेत गरजूंना भांडी व पेट्या वाटप, तसेच इतर लाभदायी उपाययोजना राबविण्यातही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत प्रभागातील महिलांना मार्गदर्शन करून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय ठरले आहे.
कोरोना काळात दिलेल्या सेवेमुळे सविता भलभले यांची ओळख जनतेच्या मनात अधिक दृढ झाली. संकटाच्या काळात नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी केलेल्या कामांची मुक्ताईनगर तालुक्यात सर्वत्र चर्चा झाली होती. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर आणि काम करण्याच्या क्षमतेवर नागरिकांनी विश्वास दाखविलेला आहे.
प्रभागातील काही प्रलंबित विकासकामांना गती देऊन त्यांची पूर्तता करण्याच्या उद्देशाने सविता भलभले यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. नागरिकांनी दिलेल्या पूर्वीच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, आगामी काळातही प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी तत्परतेने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.



