सावदा प्रतिनिधी-ताप्ती सातपुडा जर्नलिस्ट असोशियन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त तापी सातपुडा राज्य स्तरीय जीवन गौरव पुरस्कार वितरण करण्यात येणार आहेत.
विविध क्षेत्रातील संस्थे कडे आलेल्या ३५ पुरस्कारार्थी मधून संस्थेचे अध्यक्ष शाम पाटील यांनी ,उपाध्यक्ष प्रवीण पाटील, सचिव अनोमदर्शी तायडे, कार्याध्यक्ष पंकज पाटील,प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र दिपके, साजिद शेख ,राजेश पाटील यांचे उपस्थितीत पुरस्कार जाहीर करण्यात आले.
हाजी शब्बीर हुसेन,हाजी अख्तर हुसेन (बाबु शेठ) प्रतिभा संपन्न एक्सलेनस पुरस्कार ,राजेंद्र तुळशीराम चौधरी ( साहित्य रत्न ) , कविता राजेंद्र पाटील ( कर्तृत्ववान महिला) गणेश काशिनाथ पाटील ( उद्योग रत्न) डॉ. व्हि.एम.चौधरी ( धन्वंतरी रत्न ) शेख हनीफ शेख रशीद ( आदर्श उर्दू शिक्षक रत्न) प्रल्हाद गणेश अहिरे ( उद्योजक रत्न ) वाय.एस.महाजन ( आदर्श शिक्षक पुरस्कार माध्यमिक) डॉ.श्रीकांत उल्हास चौधरी ( अभियंता रत्न ) प्राचार्य डॉ.विजय रघुनाथ पाटील ( फार्मसिस्ट रत्न ) मिलिंद कुलकर्णी संपादक लोकमत ( मीडिया) राहुल रनाळकर संपादक सकाळ ( मीडिया ) , पल्लवी पुरूषोत्तम भारंबे आरोग्य सेविका ( आरोग्य सेवा)१५ क्षेत्रांतीळ मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल लॉक डाऊन काळात परप्रांतीयांना सेवा देणाऱ्या व्यक्ती ,वृक्ष संवर्धन करणारी संस्था कार्यकर्ते यांचा ही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल.
कार्यक्रम दि १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १०वाजता जेहरा मॅरेज हॉल येथे घेण्यात येणार असून या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे ,फैजपूर सतपंथ मंदिर संस्थान अध्यक्ष महामंडलेश्वर जनार्धन हरिजी महाराज,स्वामींनारायण गुरुकुल अध्यक्ष भक्ती प्रकाशदासजी शास्त्री,उपाध्यक्ष भक्ती किशोरदासजी शास्त्री, महानुभाव मठाचे मोठे बाबा सुरेशराज शास्त्री,रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार श्रीमती रक्षा खडसे,मुक्ताईनगर मतदार संघाचे आ चंद्रकांत पाटील,रावेर मतदार संघाचे आमदार शिरीष चौधरी तसेच रंजना ताई प्रल्हाद पाटील अध्यक्षा जिल्हा परिषद,रोहिणीताई खडसे-खेवलकर,नगराध्यक्षा अनिता येवले,माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राजेश वानखेडे,नगरसेवक राजेंद्र चौधरी, माजी उपनगराध्यक्ष एच पी पेट्रोल पंपचे डीलर हाजी शब्बीर हुसेन हाजी अख्तरहुसेन (बाबूसेठ) बोहरी यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न होईल.
कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन तापी सातपुडा जर्नलिस्ट असोशियन तर्फे करण्यात आले आहे.