Home आरोग्य माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडेंना कोरोनाची बाधा; ग्रामीण रूग्णालयात उपचार

माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडेंना कोरोनाची बाधा; ग्रामीण रूग्णालयात उपचार

0
27

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । येथील माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे Rajesh Wankhede यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असून ते मुक्ताईनगरच्या ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत.

कोरोनाचा संसर्ग उघडकीस आल्यानंतर माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे Rajesh Wankhede यांनी पहिल्या दिवसापासून रूग्णसेवा केली आहे. बाधितांच्या चाचण्यांपासून ते गरजूंना मदत करण्यासाठी त्यांना नेहमीच पुढाकार राहिला आहे. अलीकडच्या काळातच त्यांनी कोरोनाच्या नवीन लाटेपासून बचाव करण्यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन केले होते. यानंतर आता त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यांनी याबाबतची माहिती स्वत: देऊन आपल्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, राजेश वानखेडे यांचा चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती मिळताच आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांची विचारपूस करून मुक्ताईनगर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल होण्याचा आग्रह केला. यानुसार राजेश वानखेडे हे आता या ग्रामीण रूग्णालयात उपचार घेत आहेत.


Protected Content

Play sound