यावल प्रतिनिधी । येथील सावखेड सिम तालुक्यातील आज दि. 24 जुलै रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय रोटा व्हायरस लसीकरण अभियानास सुरुवात करण्यात आली आहे.
रोटा व्हायरसमुळे अतिसार होण्याचा धोका आपल्या देशात नव्हे तर संपुर्ण जगामध्ये मुलांना असतो. रोटा व्हायरस अतिसारामुळे होणाऱ्या मृत्युमध्ये ५० टक्के मुलांच्या मृत्यु वयाच्या पहिल्या वर्षामध्ये होतात तर जवळ्पास ७५ टक्के मुलांच्या मृत्यु पहिल्या किंवा दुसरा वर्षात होत असतो. कुपोषित मुलांमध्ये जर उपचार त्वरीत व पुरेशा प्रमाणात करण्यात आले नाही तर अतिसार गंभीर स्वरूप घेवु शकतो, त्यामुळे मुलाचा मृत्युदेखील होवु शकतो. अशी बाळांच्या आरोग्य विषयक माहीती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे यांनी दिली आहे. याप्रसंगी उपस्थित प्रसुती झालेल्या महिलांना व आशा वर्क्स यांना मार्गदर्शन करतांना डॉ. हेमंत बऱ्हाटे यांनी पुढे सांगितले की, रोटा व्हायरस एक अत्यंत संक्रामक विषाणु आहे. सामान्यतः रोटा व्हायरस एका मुलाकडुन दुसऱ्या मुलाला शौच, दुषित पाणी, अन्न व अस्वच्छ हातांच्या संपर्कात येण्याने पसरतो. हा व्हायरस अनेक तास मुलांचे हात व अन्य कठीण पृष्ठभागांवर दिर्घकाळपर्यंत जिवंत राहु शकतो. बाळाच्या आरोग्याविषयी गंभीर व प्रत्येक माताने जागृत राहणे, अत्यंत गरजे असल्याची सखोल माहीती व मार्गदर्शन डॉ. हेमंत बऱ्हाटे यांनी केलं आहे. आज पासुन सुरू करण्यात आलेल्या या रोटा व्हायरस लसीकरण अभियांना अंतर्गत तालुक्यातील सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केन्द्र, साकळी प्राथमिक आरोग्य केन्द्र त्याप्रमाणे किनगाव, हिंगोणा ,पाडळसा, भालोद, असे एकुण 6 प्राथमिक केंद्र व ३४ उपकेंद्रावर, त्याचप्रमाणे शहरी भागातील ग्रामीण रुग्णालय, न्हावी ग्रामीण रुग्णालयांच्या माध्यमातुन हे रोटा व्हायरस लसीकरण अभियान राबविले जाणार आहे.
यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या सविता भालेराव, पंचायत समितीचे सदस्य व गटनेते शेखर पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे, डॉ.नसीबा तडवी, सामाजिक कार्यकर्ते अतुल भालेराव, मसाकाचे माजी संचालक सरदार तडवी आदी मान्यवरांच्या उपास्थितीत होती. सावखेडा सिम प्राथमिक केंद्रापासून सुरुवात करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन, मान्यवरांचे परिचय व आभार आरोग्य सेवक प्रविण सराफ यांनी मानले.