Home Cities रावेर सावदा न.पा. हद्दवाढीच्या अधिसूचनेचा आदेश प्राप्त : नागरिक समाधानी

सावदा न.पा. हद्दवाढीच्या अधिसूचनेचा आदेश प्राप्त : नागरिक समाधानी


 

सावदा, प्रतिनिधी | येथील नगर पालिका हद्दवाढीच्या अंतिम अधिसूचनेचा आदेश नुकताच नगर विकास विभागाचे उपसचिव कैलास बधान यांनी काढला असून तो आज येथे प्राप्त झाला आहे. यामुळे शहराच्या विस्तारित भागात राहणाऱ्या नागरिकांना नगर पालिकेच्या मूल-भूत सुविधा उपलब्ध होणार आहेत.

 

यापूर्वी नगर पालिकेची हद्दवाढ झाल्याची घोषणा २ मार्च २०१९ रोजी झाली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या दालनात हद्दवाढीवर काही हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यानंतर दि. ४ नोव्हेंबर रोजी अंतिम हद्दवाढ करण्याची अधिसूचना काढण्यात आली आहे. यामुळे शहराच्या विस्तारित भागातील सर्व कॉलन्या आणि नगरे, यापुढे नगर पालिका हद्दित येणार आहेत. या निर्णयामुळे या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.


Protected Content

Play sound