धुळे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मार्क्सवाद फुले – आंबेडकरवाद या वैचारिक सिध्दांतावर गेल्या काही दशकांपासून महाराष्ट्र राज्यामध्ये सत्यशोधक विद्यार्थी संघटना आपली क्रांतिकारी भूमिका घेऊन कार्यरत आहे. शिक्षणातील जातीभेद, वर्गभेद, स्त्री दास्य नष्ट करण्याचे उद्दिष्ट ठेवून शिक्षण क्षेत्रात सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि सांस्कृतिक परिवर्तनाची भूमिका घेवून विद्यार्थ्यांच्या अधिकारासाठी लढे उभारले जातात.कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करण्यासाठीं केले जाते. यासाठी विद्यार्थी कार्यकर्ते प्रशिक्षीत होणे गरजेचे असतात त्याचाच एक भाग म्हणून धुळे येथे दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. उद्घाटक सत्रात अध्यक्ष सत्यशोधक डेमोक्रॅटिक पार्टी चे पार्टी सचिव सिद्धार्थ अण्णा जगदेव उपस्थित होते तसेच प्रमुख उपस्थिती प्रा. बाबा हातेकर आणि मा. रामेश्वर चत्रे आणि सविस चे राज्य सचिव विकास मोरे, राज्य अध्यक्ष राहुल कदम हे उपस्थित होते.
विद्यार्थी चळवळ आणि विद्यार्थी चळवळी पुढील आव्हाने, सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे लढे आणि भूमिका, सरकारचे विरोधी धोरण आणि दलीत, आदिवासी, ओबीसी, शेतकरी कामगार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य, राजकारणाचे संघिकरान आणि त्याचा विद्यार्थी शिक्षक व शिक्षण व्यवस्थेवरील परिणाम, NEP राष्ट्रीय शिक्षण धोरण 2024 आणि शिक्षण व्यवस्थेतील बदलाचे परिणाम या सारख्या विषयांवर शिबिराच्या दोन दिवसांत तज्ञ मार्गदर्शकानी मार्गदर्शन केले शिबिरात सामील झालेल्या कार्यकर्त्यानी गट चर्चा दरम्यान देखील विविध सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक समस्यांवर वैचारिक मंथन करून पोस्टर बनवून सादरीकरण केले. पहिल्या दिवशी शिबिरात खुले कवी संमेलन देखील आयोजित करण्यात आले होते.
शिबिरामध्ये सत्यशोधक विद्यार्थी संघटनेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्या विद्यार्थ्यांच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सत्कार करण्यात करण्यात आला. सत्कारार्थी म्हणून मानसी पवार ( महाराष्ट्र पोलीस म्हणून निवड ), विजय वाघ (टीआयएसएस मुंबई मध्ये दलित अँड ट्रायबल स्टडीज अँड अँक्शन ह्या एम. ए अभ्यासक्रमात प्रवेश) अविनाश तायडे, (आयआयटी गांधीनगर मध्ये सोसायटी अँड कल्चर ह्या एम. ए अभ्यासक्रमात प्रवेश) यांचा सत्कार करण्यात आला.
शिबिराच्या समारोप सत्रालां अध्यक्ष म्हणून सत्यशोधक डेमोक्रॅटिक पार्टी चे पार्टी सचिव सिद्धार्थ अण्णा जगदेव, प्रमुख उपस्थिती म्हणून के.ई. हरिदास औरंगाबाद, कॉ. नजुबाई गावित उपस्थित होते समारोप सत्रात राज्य सचिव यांनी नवीन राज्याची कार्यकारणी घोषणा केली. सत्यशोधक विद्यार्थी संघटना महाराष्ट्र अध्यक्ष सिद्धान्त बागुल आणि सत्यशोधक विद्यार्थी संघटना महाराष्ट्र राज्य सचिव म्हणून तुषार सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली. तसेच राज्य उपाध्यक्ष निशिकांत कांबळे, महाराष्ट्र राज्य संघटक राहुल कदम, विजय वाघ, जितेंद्र अहिरे, जयेश पठाडे, सूरज तरारे यांची निवड करण्यात आली आणि महाराष्ट्र राज्य सदस्य म्हणून विकास मोरे ( मुंबई ), सुरेश सानप ( औरंगाबाद ) अंकुश मेढे (जळगाव) अविनाश तायडे (जळगाव), अनिकेत तांबे (सिंधुदुर्ग), रितेश तांबे (मुंबई), विशाखा बुऱ्हे (औरंगाबाद), दिपाली भालेराव (मुंबई), राकेश अहिरे ( धुळे ), राकेश ( गडचिरोली ), सचिन खंदारे ( औरंगाबाद ), प्रसाद कुकडेकर ( नांदेड ) यांची निवड करण्यात आली.