सातपुडा जंगल सफारी वाघाचे दर्शन

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | १२ नोव्हेंबर रोजी न्यायाधीश शंकर पवार व त्याचे सहकारी सातपुडा जंगल सफारी आले असता. त्यांनी रावेर वनक्षेत्रातील नियतक्षेत्र गारबर्डी, लोहारा, कुसुंबा क्षेत्रात सकाळी सात वाजेपासून जंगल सफारीस  सुरुवात केली. सुरुवातीलाच मोर, लांडोर यांच्या ग्रुप दिसून आला पुढे शिकारी पक्षी वाईहिट आय बाजड व सिरकीर मालकोवा पक्षी दिसून आले. त्यानंतर साधारण 8 वाजेच्या सुमारास सफारी रस्त्याने  रुबाबात चालत असणारा बिबट दिसून आला. त्यापासून  पाच ते सहाशे मीटर अंतरावर सातपुडा जंगल सफारीत प्रथमच वाघोबाचे दर्शन झाले.

या सफरीत पावरगंगोत्री धबधबा, चिंचाटी धरण, अंजन कुटी, बांबू कुटी, नेकलेस पॉईंट,सातपुडा व्हिव पॉईंट, पहिले व त्यांचे दृश्य मोबाईल मध्ये टिपले.त्याचा मते जळगाव जिल्हातील पाल हे हिमालय,शिमला, उत्तराखंड, याची अनुभूती देते. येथील जंगल निसर्गरम्य असून या परिसरात पर्यटकांची खूपच कमतरता आहे.

अंजन मचनावरून पाहिलेले चिंचाटी धरण परिसर ताडोबा जंगलाची आठवण करून देतो. तसेच 150 ते 200 फुटाचा अंतरावरून पडणारे गंगोत्री धबधब्याचे पाणी धूत सागरासारखे दिसते. यावल वन विभागातील सातपुडा जंगल सफारी  करून मला व माझ्या सहकाऱ्यांना खूप आनंद मिळाला.भविष्यात  या सातपुडा जंगल सफारीचा परिसर नक्कीच नाव रुपयाला येईल यात शंकाच नाही  असे मत त्यांनी व्यक्त केले.

Protected Content