सावदा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी l येथील लेवा समाजातील नामांकित घराणे कै. विष्णू हरी पाटील यांचे नातू सतीश वसंतराव पाटील अमेरिका येथे स्थायिक असून त्यांना नुकताच लेवा आयकॉन पुरस्काराने गौरविण्यात आले. सतीश पाटील यांनी अमेरिका येथे उद्योग सुरु करुन मोठी प्रगती केली आहे त्यांना सलग 40 वर्ष बिनविरोध सावदा नगराध्यक्ष राहिलेले स्व विष्णू हरी पाटील आजोबा यांचा व भारत कृषक समाज नविदिल्ली चे राष्ट्रीय अध्यक्ष वसंतराव विष्णू पाटील यांचा मोठा वारसा लाभला आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे माजी मंत्री एकनाथ खडसे व मान्यवर यांचे हस्ते गौरव करण्यात आला. या प्रसंगी वसंतराव पाटील औद्योगिक वसाहत चे चेअरमन त्यांचे बंधू मनोजकुमार पाटील, सौ प्रतिभा पाटील, सविता पाटील या परिवारासह पुरस्कार स्वीकारला. या पुरस्काराचे वितरण प्रसंगी आ. अमोल जावळे, आमदार राजुमामा भोळे, माजी आमदार शिरीष चौधरी व मान्यवर समाज बांधव उपस्थित होते. या पुरस्कार निमित्ताने स्व. विष्णू हरी पाटील परिवाराने लेवा समाजाचे प्रतिकूल काळात केलेले भरीव कार्य, शिक्षण व धार्मिक क्षेत्रात केलेली भरीव आर्थिक मदत या समाज कार्यास उजाळा मिळाला आहे व हेच कार्य पुढची पिढी करीत असल्याचं उल्लेख मान्यवरांनी याप्रसंगी केला. यावेळी सतीश वसंतराव पाटील यांचे नरेंद्र नारखेडे, डा गिरीश लोखडे, अनिल नारखेडे, शरद महाजन, चंद्रशेखर चौधरी, पी. एल. पाटील,
पदमाकर पाटील, ए. के. जावळे आदींनी अभिनंदन केले आहे. लेवा समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचे कार्य गाथा धनंजय कोल्हे यांनी तयार केली असून त्यामध्ये सतीश पाटील यांचा समावेश असून हा कार्यक्रम मुंबईत पार पडला.
सतीश पाटील लेवा आयकॉन पुरस्काराने सन्मानित
3 months ago
No Comments