जळगाव प्रतिनिधी । नागझिरी, मोहाडी येथील श्री माता मनुदेवी बहूउददेशिय संस्था संचलित सरस्वती इंटरनॅशनल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘कल्चरल वीक’ कार्यक्रम साजरा करण्यात आला. त्यात टेबल कॉम्पटिशन, ड्रॉईंग कॉम्पीटीशन, फॅन्सी ड्रेस कॉम्पीटीशन या स्पर्धा घेण्यात आल्या.
16 ते 20 डिसेंबर 2019 या कालावधीत आयोजित केलेल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत छोट्या किलबिल पाखरांनी छान सहभाग दाखवला. फळे, फुले, भाज्या, प्राणी तसेच देव, दानव या विषयावर छान वेशभूषा करून मुलांनी सहभाग नोंदविला. मुलांना फळे, फुले, भाज्या व प्राणी याविषयी चांगल्या प्रकारे माहिती समजून देता आली. शाळा फुलांनी फळांनी बहरून निघाली. मोठ्या मुलांनी देव आणि दानव या विषयावर छान तयारी केली होती. तसेच मुकेश सरांनी देखील मुलांना छान मार्गदर्शन दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुकेशभाऊ सोनवणे, रामकृष्ण जाधव, सचिव निकीता सोनवणे, सरस्वताआई सोनवणे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रिन्सीपल मालु सपकाळे, रचना खिलोसीया, राजु जाधव, संतोष पट्टीवाले आदींनी परिश्रम घेतले.