यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील पाडळसे येथील ग्राम पंचायत सदस्य सुदेश कडू बाविस्कर यांनी मासिक सभेत गावाच्या लोकनियुक्त महिला सरपंच गुणवंती पाटील यांना कामाबद्दल आणि खर्चाबाबत मासिक मिटिंग मध्ये विचारणा केली म्हणून पती सूरज मनोहर पाटील यांना राग आल्याने त्याचा जाब विचारणाऱ्या सदस्याला सरपंचपतीची जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, पाडळसा ग्रामपंचायतच्या विद्यमान लोकनियुक्त सरपंच गुणवंती सुरज पाटील यांना मासिक सभेत ग्रामपंचायत सदस्य सुरेश बाविस्कर यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झाले. कामाबाबत विचारणा केली असता महिला सरपंच त्यांचे पती सूरज मनोहर पाटील हे ग्रामपंचायत सदस्य सुदेश कडू बाविस्कर यांच्या घराजवळ सरपंचपती सुरज पाटील यांनी त्यांना शिवीगाळ केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. ग्रामपंचायत सदस्य सुदेश बाविस्कर यांनी दिलेल्या तक्रारी वरून फैजपूर पोलीस ठाण्यात भादवि ५०४, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस पुढील तपास करीत आहे.
याबाबत सरपंच पती सूरज पाटील यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कि, माझ्या वाड्यातील पिंपळच्या फांद्या मजूर लावुन तोडत होते, ते पाहण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य सुदेश कडू बाविस्कर यांनी मला मज्जाव केला. तो अधिकार आम्हा सदस्यांचा असून ते काम पाहण्याचा तुला अधिकार नाही. मी त्यांना समजावले कि नागरिक म्हणून काम पाहू शकतो, याचाच राग सुदेश बाविस्कर यांना आल्याने त्यांनी माझ्या विरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असे सूरज पाटील यांनी सांगितले.