म्हसावद येथील सरपंचाला कारण नसतांना बेदम मारहाण; दोघांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील म्हसावद येथील सरपंचाच्या घरात दोन जणांनी अनधिकृतपणे प्रवेश करून सरपंचाला बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. याप्रकरणी दोन जणांवर एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, गोविंदा प्रकाश पवार (वय-३१) रा. बौध्द वाडा म्हसावद ता.जि.जळगाव हा तरूण म्हसावद गावाचा सरपंच आहे. सोमवारी २६ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास रविंद्र त्र्यंबक हडपे (धनगर) आणि सतिष पंडीत धनगर दोन्ही रा. म्हसावद यांनी सरपंच गोविंदा पवार यांच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला. याबाबत सरपंच यांची आई कलाबाई पवार यांनी हटकले असता दोघांनी शिवीगाळ केली व थेट सरंपच गोविंदा पवार याला बेदम मारहाण केली. यात कलाबाई पवार यांनी आवराआवर केली असता त्यांनाही मारहाण केली. संशयित आरोपी रविंद्र हडपे यांने लाथ मारून म्हणाला की, तू सरंपच झाला आहे त्यामुळे तुला माज आला आहे का, तुला ग्रामपंचायतीच्या इमारतीवरून फेकून देईन अशी धमकी दिली. याप्रकरणी सरपंच गोविंदा पवार यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ बळीराम सपकाळे करीत आहे. 

 

Protected Content