ग्रामपंचायतीचे दप्तर सरपंचाने बेकायदेशीर घरीच ठेवले; ग्रामस्थांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाचोरा तालुक्यातील लोहारी बुद्रुक गृप पंचायतीचे दप्तर तेथील सरपंचाने बेकायदेशीर घरी ठेवत असुन ग्रामस्थांना समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने ग्रामस्थांमधुन नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित सरपंच यांचे विरुद्ध कारवाई करण्यात यावी अशा आशयाच्या मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी पाचोरा गटविकास अधिकारी यांना निवेदन आहे.

मौजे लोहारी येथील नरेंद्र रामदास बडगुजर व ग्रामस्थांनी गृप ग्रामपंचायतीच्या प्रोसेडींगच्या नकलांची मागणी ग्राम विकास अधिकारी यांच्याकडे केली असता, ग्रामविकास अधिकारी यांनी माइयाकडे दप्तर उपलब्ध नाही, म्हणुन सांगितले. सदर दप्तर सरपंच रंजना प्रविण पाटील व त्यांचे पती प्रविण नामदेव पाटील यांच्या घरी आहे. त्यांनी ते ग्रामपंचायतीत जमा केले नाही, असे सांगितले.

सरपंच यांनी ग्रामविकास अधिकारी उपस्थित नसतांना बेकायदेशिर ग्रामसभा व मासिक सभा घेवुन दप्तर आपल्या घरी ठेवले आहे व ग्रामविकास अधिकारी यांच्या बदली साठी बनावट ठराव व तक्रारी आपल्या कार्यालयात केल्या आहेत. याप्रकरणी सरपंच यांची चौकशी करून अपात्र करण्यात यावे व ग्रामविकास अधिकारी यांची बदली करण्या आधी चौकशी करण्यात यावी असे न झाल्यास ग्रामस्थांनी उपोषणास बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर नरेंद्र बडगुजर, अनंत बडगुजर, दिपक पाटील, संदिप पाटील, कडुबा बडगुजर, यशोदिप पाटील, हिरामण बडगुजर, रविंद्र बडगुजर, नाना पाटील, पितांबर बडगुजर, भास्कर बडगुजर यांच्या सह्या आहेत

Protected Content