Home Cities यावल सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश स्कूलने दहावीच्या विद्यार्थ्यांना दिला निरोप

सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश स्कूलने दहावीच्या विद्यार्थ्यांना दिला निरोप


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील सरदार वल्लभभाई पटेल स्कूल मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा भावनिक असा निरोप समारोपाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. स्कुलच्या सभागृहात पार पडलेल्या दहावी विद्यार्थ्यांच्या निरोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष राजेंद्र महाजन, शाळा सदस्य शशिकांत फेगडे व सदस्य मंगला फेगडे, सरस्वती विद्या मंदिर शाळेचे नरेंद्र महाले, फैजपूर येथील डी. एन. कॉलेजचे प्राध्यापक सचिन भिडे इत्यादी मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते.

कार्यकमात सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका शिला तायडे यांनी प्रमुख अतिथींचा स्वागत सत्कार केले. नंतर कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. शशिकांत फेगडे व नरेंद्र महाले तसेच सचिन भिडे यांनी इयता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर असे भाषण करून त्यांना शैक्षणिक भावी वाटचालीस व आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी आपल्या शाळेतील बालपण व जीवनाचे अनुभव आपल्या विचारातून व्यक्त केले. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू व गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन झीनत शेख यांनी केले. राजेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. प्रशांत फेगडे तसेच सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी वर्ग या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमास यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल स्कुलचे सर्व शिक्षीका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound