Home Cities भुसावळ भुसावळ नगरपालिकेची बोगसगिरी; २८ ची बैठक बेकायदेशीर- संतोष चौधरी ( व्हिडीओ )

भुसावळ नगरपालिकेची बोगसगिरी; २८ ची बैठक बेकायदेशीर- संतोष चौधरी ( व्हिडीओ )

0
80

भुसावळ प्रतिनिधी । येथील नगरपालिकेने बोगसगिरी करून २८ फेब्रुवारी रोजी घेतलेली बैठक बेकायदेशीर असून याला रद्द करण्याची मागणी होणार असल्याची माहिती आज माजी आमदार संतोष चौधरी यांनी दिली.

माजी आमदार संतोष चौधरी यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत नगरपालिकेतील सत्ताधार्‍यांनी राजकीय आकसापोटी आपल्या सहकार्‍यांवर कारवाई केल्याचा आरोप केला. याप्रसंगी त्यांनी भुसावळ नगरपालिकेने बोगसगिरी करून २८ फेब्रुवारी रोजी बैठक बोलविली आहे. यात अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. मात्र याचा अजेंडा जनआधारच्या त्या चार नगरसेवकांना देण्यात आलेला नाही. यामुळे ही बैठक बेकायदेशीर असून याला रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आल्याची माहिती संतोष चौधरी यांनी दिली.

पहा– माजी आमदार संतोष चौधरी नेमके काय म्हणाले ते !


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound