पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्रात चाललेल्या सत्ता नाट्य आणि फोडाफोडीच्या राजकारणाला जनता कंटाळलेली असून सामान्य माणसांनी आपला संताप व्यक्त करण्यासाठी सही म्हणून आपला विरोध करत पाचोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्यातील गलिच्छ राजकारण आहे हे दाखवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे “संतापाची सही” हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमाला शहरातील जनतेने उस्फुर्त प्रतिसाद दिला असुन लोकांमध्ये या उपक्रमाची एकच चर्चा होती. आणि आता महाराष्ट्रात फक्त राज ठाकरेच काहीतरी करु शकतात. आता फक्त ते एकच पर्याय असल्याचा जनतेतुन सुर उमटत होता. या उपक्रमा प्रसंगी मनसेचे तालुका अध्यक्ष शुभम पाटील, शहराध्यक्ष ऋषिकेश भोई, शेतकरी सेनेचे ज्ञानेश्वर ठाकरे, उपशहराध्यक्ष यश रोकडे, शहर सरचिटणीस श्रीकृष्ण दुंदुले, शहर संघटक निलेश मराठे, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष हर्षल अहिरे, उपशहर अध्यक्ष वाल्मीक जगताप, भारत सोनार आदी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.