संताजी जगनाडे महाराजांची जयंती जल्लोषात साजरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तेली समाजाचे आराध्य दैवत संताजी जगनाडे ‎‎महाराज यांची ४०० वी जयंती रविवारी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. शारदा एज्युकेशनल फाउंडेशनच्यावतीने या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. पांजरपोळ चौकापासून या मिरवणुकीला सुरुवात होऊन मजबूर चौक, तेली चौक, जोशी पेठ, हनुमान मंदिर, का. ऊ. कोल्हे शाळामार्गे कालिंका माता मंदिर‎परिसरातील संताजी जगनाडे महाराज बगिचा या ठिकाणी‎ समारोप करण्यात आला. या ठिकाणी महाराजांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. ५५ पेक्षा जास्त मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन आपली चुणूक दाखविली. यावेळी आरोग्य शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. यात १३७ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉ. सुषमा चौधरी आणि डॉ. दीपक चौधरी तपासणी केली.

कार्यक्रमात फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत सुरळकर, उपाध्यक्ष पवन चौधरी, सचिव रामचंद्र चौधरी, सहसचिव मनोज चौधरी, खजिनदार संदीप चौधरी, विशाल पाटील, प्रकाश चौधरी, उमेश चौधरी, शोभा चौधरी, डॉ. सुषमा चौधरी, निर्मला चौधरी, बेबाबाई सुरळकर, योगराज चौधरी, प्रकाश चौधरी, चेतन चौधरी राहुल चौधरी, नदू चौधरी, उद्योगपती विजय चौधरी, संतोष चौधरी, मोहित चौधरी, जितेंद्र चौधरी, तुनेश चौधरी, आशिष चौधरी, विशाल चौधरी, मंगेश चौधरी, प्रसाद चौधरी, पंकज चौधरी, बंटी चौधरी, सागर चौधरी, बेबाबाई चौधरी, संगीता चौधरी, लता चौधरी, पुष्पा चौधरी, सरिता चौधरी, रोहिणी सुरळकर यांसह १ हजार पेक्षा जास्त समाज बांधव सहभागी झाले होते.

Protected Content