Home धर्म-समाज पारोळ्यात संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंती उत्साहात

पारोळ्यात संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंती उत्साहात


पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त पारोळा शहरात भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सामाजिक समरसता, समता आणि मानवतावादाचा संदेश देणाऱ्या गुरु रविदास महाराज यांच्या विचारांना उजाळा देत नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला.

राम मंदिर चौक, संत रोहिदास नगर परिसरात जयंतीनिमित्त फलकाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर राम मंदिर चौक येथे प्रतिमापूजनाचा कार्यक्रम पार पडला. नगरपालिकेच्या वतीनेही प्रतिमापूजन करून गुरु रविदास महाराजांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान त्यांच्या कार्याचा आणि सामाजिक योगदानाचा गौरव करण्यात आला.

या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष दीपक अनुष्ठान, लक्ष्मण महाले, दयाराम मोरे, गौतम वानखेडे, रतिलाल मोरे, किरण पवार, प्रा. गव्हानेसर, प्रा. डोळे फोड सर, जीवन मोरे, विजय मोरे सर, अशोक नेरकर, विठ्ठल वानखेडे, नगराज साळुंके तसेच सामाजिक समरसता मंचचे दत्ताजी महाजन, विशाल महाजन, ज्ञानेश्वर बुंदे, प्रितेश जैन, विजय बागुल, राहुल सरदार, अमोल चौधरी, आधार मोरे, आनंद अहिरे, खंडू आठवले, रवींद्र अनुष्ठान, किरण आठवले, रमेश मोरे, ईश्वर अहिरे, श्याम पवार, नंदू वानखेडे, दशरथ अहिरे, रवींद्र अहिरे, संतोष वाघ, करण साळुंके, शंकर वाघ, प्रवीण आठवले, दीपक आठवले, पंकज खाजुरे, अमर वाघ, पुनम अहिरे, रोहित अहिरे, राजू महाले, नितीन आठवले यांच्यासह सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात गुरु रविदास महाराजांच्या विचारधारेवर आधारित मनोगत व्यक्त करण्यात आले. जातीभेद, अन्याय आणि विषमतेविरुद्ध त्यांनी दिलेला संदेश आजही समाजासाठी मार्गदर्शक असल्याचे वक्त्यांनी नमूद केले. शांतता, बंधुता आणि सामाजिक एकोपा जपण्याचा संकल्प उपस्थितांनी यावेळी व्यक्त केला.


Protected Content

Play sound