अमळनेर प्रतिनिधी । येथील संत सखाराम महाराज यात्रोत्सवास उद्या अक्षय तृतीया पासून स्तंभा रोपण ध्वजारोहण करून प्रारंभ होणार आहे.
संत सखाराम महाराजांच्या यात्रोत्सवात १५ मे रोजी ग्रंथ उत्सव तर १९ मे ला पालखी मिरवणूक निघणार आहे. बोरी नदीपात्रात नुकताच संत सखाराम महाराज शताब्दी वर्ष मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले. त्याच धर्तीवर या मंदिर परिसरात मोठी यात्रा भरते. उद्या दिनांक सात मे रोजी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर समाधी मंदिर व वाडी मंदिराच्या मध्ये संत सखाराम महाराजांचे अकरावे गादी पुरुष प्रसाद महाराज यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता स्तंभरोपन व ध्वजारोहण करण्यात येणार आहे. यानंतर ७ ते १४ मे दरम्यान तुकाराम महाराज गाथा, हभप एकनाथबुवा पंढरीनाथ कांगणे शारंगधर गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली वारकरी शिक्षण संस्था अमळनेरच्या विद्यार्थी भजनी मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. १४ मे रोजी त्याची सांगता होणार आहे. १४ रोजी सखाराम महाराजांचे शिष्य मोहन महाराज बेलापुरकर यांचे व दिंडीचे आगमन सकाळी साडेसात वाजता होणार आहे.
यानंतर १५ ते १८ मेच्या दरम्यान हरिभक्त जयदेवबुवा अमळनेर, बेलापूरकर महाराज, बबन महाराज पिंपळे सिम, अरुण महाराज पिंपळेसिम, गुलाबबुवा लोणकर, नारायणबुवा मालपुरकर, बाजीराव महाराज आळंदी भाईदासबुवा देवगाव, कोमल सिंग महाराज, संतोष भाऊ अमळनेर, गोकुळबुवा पिंपळी, कैलास महाराज टाकरखेडे, भगवान बुवा सडगावकर, प्रकाश बुवा, त्र्यंबक बुवा, रूपचंद महाराज यांच्या कीर्तन सप्ताहाचा कार्यक्रम होणार आहे. भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा असे असे आवहन आयोजकांनी केले आहे.