पंचशिल मित्र मंडळातर्फे संत रविदास महाराज जयंती उत्साहात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या ६४७ व्या जयंती उत्सवानिमित्त पंचशिल मित्र मंडळाच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गेंदालाल मिल, जळगाव येथे आयोजित या कार्यक्रमास विविध मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राजू मोरे, प्रमोद पदमे, पिंटू सपकाळ, दिलीप आहिरे, नितीन मोरे, योगेश सोनवणे यांनी उपस्थिती दर्शवली. तसेच दिलीप बनसोडे, लुकास अजमाने, दीपक झुंझरराव, विजय सुरवाडे, बाळा निकम, सिद्धार्थ शिरसाट, प्रेमसागर मोरे, विनोद मोरे, बंटी सोनवणे, जितू आहिरे, बादशहा आहिरे, दीपक भालेराव, रामदास पवार, विनोद पवार, युवराज बागडे यांच्यासह अनेक मान्यवर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमात गुरु रविदास महाराज यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत त्यांचे विचार आणि सामाजिक योगदान यावर मार्गदर्शन करण्यात आले. समाजातील एकात्मता आणि समतेच्या संदेशावर भर देत, उपस्थित मान्यवरांनी गुरु रविदास महाराजांच्या शिकवणींना अनुसरून समाज घडविण्याचा संदेश दिला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचशिल मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. या भव्य उत्सवाने समाजातील बंधुभाव अधिक दृढ झाला असून, उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

Protected Content