पाचोरा येथे संत रविदास महाराज जयंतीनिमित्त पालखी सोहळा (व्हिडीओ)


पाचोरा प्रतिनिधी । येथे संत रविदास जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्त आज सकाळी शहरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली.

पाचोरा शहरातील बाहेरपुरा जवाहर हौसिंग सोसायटी पंचमुखी हनुमान चौक येथे रोहिदास महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. सकाळी ९ वाजता महिलांच्या लेझीम पथका सह भजनी मंडळी सह पालखी सोहळा काढण्यात आली. उत्सव समितीचे अध्यक्ष नाना मोरे, कार्याध्यक्ष हभप बापू महाराज अहिरे, वसंत वाघ, गोपाल मोरे, किरण महाले, संजय बोरसे, बबलू लिंगायत, सुकलाल अहिरे, रमेश शशिकांत लिंगायत, सुधाकर लिंगायत, सोनू वानखेडे, अजय देसाई, अनिल अहिरे, रमेश सावंत, समाधान बागुल, अनिल तायडे, मनोज निकम, अशोक वाघ, संतोष पवार, संतोष जनार्दन गाडेकर, संदीप सावकारे, सतीश लिंगायत, सुनील सावंत, राहुल सोनवणे, संजय बोरसे, गंगाराम तेली, संदीप पाडेकर, नितीन तावडे, ललित बाविस्कर, महीला समिती आशाबाई निकम, मंगलाबाई चव्हाण, रत्ना तेली, रेखा गाडेकर, मनीषा तायडे, शकुंतला वाघ, रोहिणी देवरे, लता मोर, सुनंदाबाई बोरसे, मीराबाई पवार, संगीत रंजनाबाई, मंगलाबाई विसावे यांच्यासह सर्वसमाज बांधव
यावेळी सर्व पक्षाचे व सामाजिक संघटनेच्या व विविध समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार किशोर पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, माजी आमदार दिलीप वाघ, मुकुंद बिल्दीकर, जितेंद्र जैन उपस्थित होते. दरम्यान, आज सायंकाळी संत रविदास गीतांचा प्रबोधानात्मक कार्यक्रम शाहीर बंडू जाधव जालना यांच्या माध्यमातून होणार आहे. यानंतर २० फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या हभप भागवताचार्य इंद्रायणी ताई मोरे पात्रेकर यांचे कीर्तन आयोजित केले आहे.

पहा– पाचोरा येथील संत रोहिदास यांच्या पालखी सोहळयाचा व्हिडीओ.

Add Comment

Protected Content