Home Cities एरंडोल संत गोरोबा कुंभार पुण्यतिथीनिमित्त पालखी मिरवणूक

संत गोरोबा कुंभार पुण्यतिथीनिमित्त पालखी मिरवणूक

0
64

कासोदा, ता. एरंडोल प्रतिनिधी । येथे संत गोरोबाकाका कुंभार यांच्या पुण्यतिथीनिमित्त पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले.

कासोदा येथील कुंभार समाज बांधवांनी संत गोरोबाकाका कुंभार यांच्या ७०२ व्या जयंतीचे औचित्य साधून पालखी मिरवणूक काढली. मिरवणुकीची सुरुवात कन्या माध्यमिक शाळेसमोरून झाली. बस स्टॉप मार्गे मेन रोड कुंभार गल्ली, भोई गल्ली मार्गे भजन-कीर्तन म्हणत पालखी काढण्यात आली. यात समाजमंडळाचे अध्यक्ष लोटन कुंभार, उपाध्यक्ष दामु कुंभार, योगेश कुंभार टेलर, अशोक कुंभार, नारायण कुंभार, आनंदा कुंभार, संजय कुंभार, महेश कुंभार,शुभम कुंभार, मोतीराम कुंभार, ज्ञानदेव कुंभार,हितेश कुंभार,कैलास कुंभार यांच्यासह समाजबांधव सहभागी झाले होते. पालखी मिरवणुकीची बिर्ला चौक कासोदा येथे सांगता करण्यात आली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound