Home Cities जामनेर टाकरखेडा येथील जि.प मराठी शाळेत संत गाडगेबाबा जयंती उत्साहात

टाकरखेडा येथील जि.प मराठी शाळेत संत गाडगेबाबा जयंती उत्साहात

0
118

पहूर. ता. जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील टाकरखेडा जि.प मराठी शाळेत नुकतीच संत गाडगेबाबा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

सुरुवातीला उपस्थितांच्या हस्ते संत गाडगेबाबा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नाना सुरळकर हे होते. यावेळी  शाळेचे मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी स्वच्छते विषयी खराटा, घमेले, फावडे या साहित्याद्वारे विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आणी संत गाडगेबाबा यांच्या विषयी मार्गदर्शन केले. देवेंद्र सुरळकर, हेमंत सुरळकर आणि मयुरी सुरळकर या विद्यार्थ्यांची तसेच उपशिक्षक शिक्षक देवाजी पाटील, जयंत शेळके श्रीमती छाया पारधे यांची भाषणे झाली.  कार्यक्रमास पालक रमाबाई सुरळकर, विजयाबाई उघडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती ज्योती उंबरकर यांनी केले व आभार रामेश्वर आहेर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक रविंद्र चौधरी, श्रीमती जयश्री पाटील यांनी परिश्रम घेतले.

 


Protected Content

Play sound