मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्याच्या पोलिस महासंचालिका रश्मी शुक्ला यांची निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागेवर राज्याचे महासंचालक म्हणून आयपीएस अधिकारी संजय कुमार वर्मा याची निवड करण्यात आली आहे. संजय वर्मा हे १९९० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवलं होतं. त्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. त्यानंतर आज संजय वर्मा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
राज्यात सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये रितेश कुमार, विवेक फणसाळकर आणि संजय वर्मा यांची नावे पोलीस महासंचालकपदासाठी आघाडीवर होती. अखेर संजय वर्मा यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी निवड झाली. संजय वर्मा हे १९९० च्या बॅचचे आपीएस अधिकारी आहेत. यापूर्वी ते राज्याच्या कायदेशीर आणि तांत्रिक विभागाचे ते डी.जी. पी राहिले आहेत. राज्यात आचार संहिता लागू झाल्यानंतर तब्बल २८ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यातील १५ अधिकारी हे मुबंईतील होते. पोलीस महासंचालकांनी राज्यभरातील ३०० हून अधिक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या होत्या. पण राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली नव्हती. रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली होती.