वाईन व्यवसायिकासोबत संजय राऊत यांची भागीदारी; किरीट सोमय्या यांचा आरोप

मुंबई वृत्तसंस्था । शिवसेनेचे संजय राऊत यांच्या कुटुंबियांची वाईन व्यावसायिकांबरोबर भागीदारी असल्याचा आरोपी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी खळबळजनक आरोप केला आहे.

 

सोमय्या पुढे म्हणाले की, ” राऊतांच्या परिवाराने काही महिन्यांपूर्वी एका वाईन व्यावसायिकासोबत बिजनेस पार्टनरशीप केली. त्यांनी जाहीर करावं की त्यांची पत्नी, त्यांची कन्या यांच्या नावावर किती भागीदारी आहे. मॅगपी ग्लोबल लिमिटेड या अशोक गर्ग यांच्या कंपनीसोबत राऊत यांची भागीदारी आहे.  त्यांचा हॉटेल, पब, क्लबस आणि काही ठिकाणी वाईन वितरित करण्याचा व्यवसाय आहे. १६ एप्रिल २०२१ रोजी राऊत कुटुंबियांनी मॅगपीसोबत करारावर सह्या केल्या. विधिता आणि पूर्वशी या संजय राऊत यांच्या दोन्ही मुली या कंपनीत संचालक आहेत.” असा आरोप केला आहे.

 

सोमय्या यांनी मॅगपी कंपनीबाबत अधिक माहिती देत म्हटले की, ”मॅगपी कंपनीचे मूळ नाव मादक प्रायव्हेट लिमिटेड असं आहे. या कंपनीची उलाढाल वार्षिक १०० कोटींची आहे. असे म्हणत, मी थेट आरोप करतोय, पण उत्तर कोणी देत नाही, असा आरोप किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर केला आहे. त्याचप्रमाणे वैजनाथ देवस्थानची जमीन ठाकरे सरकारने हडप केली. त्या जमिनीवर तहसीलदार वर दबाव आणत आहेत. ठाकरे सरकारचा वैजनाथ देवस्थान जमीन मध्ये थेट संबंध असल्याची आरोप त्यांनी केला आहे.

Protected Content