नवी दिल्ली – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भाजप काही जणांना हाताशी धरून क्रिमीनल सिंडीकेट चालवत असून महाराष्ट्रात सुडाच्या कारवाया सुरू असल्याचा घणाघाती आरोप आज खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत केलाय.
खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलतांना पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य केले. ते म्हणाले की, भाजपच्या दोन-पाच लोकांना हाताशी पकडून कशा प्रकारे एक क्रिमिनिल सिंडिकेट चालवत आहेत, याची माहिती संसदेचा सदस्य आणि शिवसैनिक म्हणून मी गोळा केली आहे. अशी माहिती मी वारंवार देत जाईन. यानंतर मुंबईत येऊन याबाबत पत्रकार परिषद घेईल. आमच्या सगळ्यांचे फोटो टॅप केलेत. तपास यंत्रणा महाराष्ट्रात सुद्धा आहेत. फक्त केंद्रातच नाहीत. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये जाणीवपूर्वक कारवाया केल्या जात आहे, या आरोप आज खासदार संजय राऊत यांनी केला.
केंद्र सरकारकडून कारवाईची कोणतीही अपेक्षा नाही. केंद्र सरकारमधल्या काही मोजक्या लोकांच्या आदेशानुसार सुडाच्या कारवाया सुरू आहेत. खासकरून महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये या कारवाया होत्यात. त्यातही महाराष्ट्रात हे प्रमाण जरा जास्तच आहे.