Home राज्य देवरांच्या राजीनाम्यावर निरूपमांचा टोला

देवरांच्या राजीनाम्यावर निरूपमांचा टोला

0
39
sanjay nirupam


sanjay nirupam

मुंबई प्रतिनिधी । मिलींद देवरा यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर या पक्षातील अंतर्गत कलह पुन्हा उफाळून आला असून संजय निरूपम यांनी त्यांना टोला मारला आहे.

मिलींद देवरा यांनी आज आपल्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यानंतर त्यांचे पक्षांतर्गत विरोधक माजी खासदार संजय निरूपम यांनी देवरांवर जोरदार हल्लाबोल केला. संजय निरूपम यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून या प्रकारावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. देवरा यांचा राजीनामा हा खरोखर राजीनामा आहे की वर जाण्याची शिडी ? असा तिरकस प्रश्‍न त्यांनी ट्विटरवरून विचारला आहे. देवरा यांना केंद्रीय पातळीवरील पद मिळण्याची शक्यता असल्याच्या पार्श्‍वभूमिवर, निरूपम यांच्या टिकेने चर्चेला उधाण आले आहे.


Protected Content

Play sound