जेडीयूच्या कार्यध्यक्षपदी संजयकुमार झा यांची निवड

पाटणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जनता दल युनायटेड (जेडीयू) पक्षाची आज राष्ट्रीय कार्यकारिणीची दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत जेडीयूचे राज्यसभा खासदार संजय कुमार झा यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. खासदार संजय कुमार झा यांची जेडीयूच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी संजय कुमार झा यांना कार्याध्यक्ष करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर जेडीयूच्या कार्याध्यक्षपदी संजय कुमार झा यांची निवड करण्यात आली.

केंद्रात असलेल्या एनडीए सरकारमध्ये जनता दल युनायटेड हा महत्वाचा पक्ष आहे. जनता दल युनायटेड पुन्हा एकदा एनडीएमध्ये सहभागी होताना संजय झा यांनी महत्वाची भूमिका बजावल्याचे बोलले जात आहे. आता खासदार संजय कुमार झा यांच्यावर पक्षाच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आल्यानंतर त्यांना भारतीय जनता पक्षाबरोबर चांगला समन्वय ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.

Protected Content