Home आरोग्य विरावली येथे स्वच्छता अभियान (व्हिडीओ)

विरावली येथे स्वच्छता अभियान (व्हिडीओ)

0
23

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील विरावली येथे नेहरू युवा केंद्र जळगाव जिल्हा प्रशासन व यावल किसान प्रोडूसर कंपनी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व ग्रामपंचायत कार्यालय आणि गावातील विविध ठिकाणी व कार्यकारी सहकारी सोसायटीच्या प्रांगणात ही साफसफाई करून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी नागरिकांनी गावातील स्वच्छता कायम ठेवण्यासाठी आपला परिसर स्वतः शैक्षणिक परिसरात स्वच्छता ठेवावी आणि गावात रोगराई वाढणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मुन्ना पाटील व आर्मीतील जवान महेंद्र पाटील यांनी याप्रसंगी उपस्थितांना आणि ग्रामस्थांना आवाहन केले.

याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा माजी सरपंच तुषार चंद्रसिंग पाटील, माजी सरपंच विश्वनाथ पाटील, भारतीय लष्करात कार्यरत असलेले सैनिक महेंद्र पाटील, गावातील प्रतिष्ठित मेहबूब तडवी, दामू अडकमोल, ग्रामपंचायत सदस्य नथू अडकमोल, धनराज पाटील, राजेंद्र पाटील, संजय पाटील, मिलिंद अडकमोल, नसिर नजीर तडवी, उपसरपंच माजी सुभान तडवी, दशरथ धनगर, भागवत पाटील, विरावली पोलीस पाटील, चंद्रकांत पाटील, कैलास पाटील, गोपाळ पाटील, दिनकर पाटील, हेमंत पाटील, प्रवीण पाटील, रवींद्र पाटील, मुकुंदा गफार, तुकडू तडवी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound