Home Cities चाळीसगाव बोरखेडे येथे कन्या शाळेला सॅनेटरी नॅपकिनचे मशीन भेट

बोरखेडे येथे कन्या शाळेला सॅनेटरी नॅपकिनचे मशीन भेट


vending mashin

चाळीसगाव, प्रतिनिधी | येथील इनरव्हिल क्लब ऑफ चाळीसगाव मिल्क सिटी यांच्यातर्फे तालुक्यातील बोरखेडे येथील कन्या शाळेत सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमीक गोजमगुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त सौ. रेखा अजय जोशी यांनी दोन फॅन व मुलींसाठी एक सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन भेट दिले आहे.

 

या कार्यक्रमास डिस्ट्रीक चेअरमन सौ.वैजयंती पाठक 303 अकोला प्रमूख पाहूणे म्हणून उपस्थित होत्या तर अध्यक्षस्थानी सौ.योगिता बंग व सौ.मनीषा पाटील या होत्या. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप घोरपडे, उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख शरद पाटील, तालुका कार्याध्यक्ष अजय जोशी, तसेच सामाजिक कार्यकर्ते पवन बंग हे उपस्थित होते.


Protected Content

Play sound